Kevdyacha Paan Tu Lyrics
केवड्याचं पान तू हे गाणे अजय गोगावले, आर्या आंबेकर यांच्या आवाजातलं ‘सरला एक कोटी’ या चित्रपटातील ‘केवड्याचं पान तू’ हे गाणं… हे गाणं ऐकल्यास ते तुम्ही नक्की गुणगुणणार इतकं सुंदर जमून आलंय.. आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
Story n Screenplay and Director – नितीन सिंधुविजय सुपेकर
Star-Cast – ईशा केसकर, छाया कदम,ओंकार भोजने, कमलाकर सातपुते, रमेश परदेशी, वनिता खरात, सुरेश विश्वकर्मा, विजय निकम, अभिजीत चव्हाण, यशपाल सारनात, जतीन ईनामदार, महेंद्र खिल्लारे, रमाकांत भालेराव, कपिल कांबळे,अभिलाषा पॉल, शाम मते, शुभम खरे, योगेश इरतकर.
Movie:- Sarla Ek Koti
Music:- Vijay Gavande
Lyrics:- Guru Thakur
Singer:- Ajay Gogavale, Aarya Ambekar
Music on:- Ultra Music
केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू
पाघुळल्या जीवाचं गं भान तू
सागराची गाज तू गालावर लाज तू
आतुरल्या डोळ्याच॔ सपान तू
तू रे गाभुळला मेघ
तुझ्या पिरतीची धग
माझ्या ओंजळीत सुख माइना
तूझा मातला मोहर
तुझ्या मिठीत पाझर
येडया काळजाचा तोल ऱ्हाइना
मेघुटाची हूल तू चांदव्याची भूल तू
भागंना कदी अशी तहान तू
केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू
पाघुळल्या जीवाचं गं भान तू
तुझ्या डोळ्यांची कमान
तितं ववाळीन प्रान
व्हइन फुफाट्यात तुझी सावली
तुझ्या जोडीनं गोडीनं
हारपुनी देहभान
आनू लक्षुमीला सोनपावली
जगन्याची रीत तू
खोप्यातली प्रीत तू
कवाच्या रं पुन्याइचं दान तू
केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू
पाघुळल्या जीवाचं गं भान तू
Kevdyacha Paan Tu Lyrics